अंजना - पळशी प्रकल्पात ग्रामस्थांचे आंदोलन

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) तालुक्यातील पिशोर गावाजवळील अंजना पळशी मध्यम प्रकल्पामुळे रामनगर हे गाव पुनर्वसीत झाले आहे. अंजना पळशी प्रकल्प उभारून २५ वर्षे पूर्ण झाले. पुनर्वसीत रामनगर हे गाव मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. ग्रामस्थांनी प्रकल्पात उतरून आंदोलन केले.


दफनभूमी आदींना जागा निश्चित जागा उपलब्ध नाही. सांडपाण्याची व्यवस्था नसणे, रस्ते, पथदिवे नसणे आदी प्रलंबित प्रश्न न सुटल्यामुळे या प्रकल्पातच जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा रामनगर ग्रामस्थांनी ८ डिसेंबर रोजी प्रशासनाला दिला होता. रामनगर येथील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी पायपीट केली. विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कारही टाकला.
तरी रामनगर ग्रामस्थांची दखल प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी घेतली नाही. रामनगर गावात
पंचवीस वर्षांपासून स्मशानभूमी, प्रशासनाकडून ग्रामस्थांना वेळोवेळी फक्त आश्वासने दिली, मात्र त्यांची पूर्तता झाली नाही. 

पोलीस बंदोबस्तात दोनदा मोजणी करण्यात आली. परंतु, समस्या कायम राहिल्यामुळे येथील नागरिक कारभारी खुर्दे, विष्णू तायडे, आकाश शेळके, कैलास खुर्दे, रघुनाथ गव्हांडे, रामहारी सोनवणे, बाळू निकम हे सोमवारी जल समाधी घेण्यासाठी सकाळी अंजना पळशी प्रकल्पाचा पाण्यात उतरले.

प्रभारी तहसीलदार दिलीप सोनवणे, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी अलका पटरे, तलाठी यांच्या पथकाने याठिकाणी भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली. बुधवारी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, गंगाधर भताने, संजय लगड, साईनाथ घुगे यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला.